हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य प्रेरणादायी

जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नंबर ४ ला खुर्च्या भेट
Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2022 14:23 PM
views 271  views

सावंतवाडी : शहरातील जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नंबर ४ ला हातभार चॅरिटेबल ट्रस्ट कडून खुर्च्या भेट देण्यात आल्या.  यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर, सं. खजिनदार नयनेश गावडे, जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे, मदन मुरकर, आनंद गावडे, समीर नाईक, जिल्हा महिला सचिन सौ. अस्मिता भराडी,महिला तालुकाध्यक्ष सौ.स्नेहा काष्टे,सौ.शमिका नाईक,शाळेचे मुख्याध्यापक पावरा सर, शिक्षक केशव जाधव, तुषार बांदेकर,श्री कदम शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते.

हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक क्षेत्रात काम करत असून कॅन्सर ग्रस्त, किडणी सारखे दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना तसेच गरीब गरजू विद्यार्थी विविध आजारावर मोफत आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम सारख्या बऱ्याच सामाजिक कार्यात काम करत आली आहे. त्याचाच भाग म्हणून शाळेला खुरच्यांची आवश्यकता असल्याचे शाळा नंबर ४ च्या वतीने हातभार ट्रस्ट ला सांगण्यात असले होते  त्यांच्या मागणीचा विचार करून शाळेला खुर्च्या भेट देण्यात आल्या.

दरम्यान, हातभार चॅरिटेबल ट्रस्ट चे कार्य प्रेरणा देणारे आहे. समाजात अनेक रुग्ण आहेत ज्यांना मदतीची आवश्यकता असते, अनेक गरिब विद्यार्थी आहेत ज्यांना शिकण्याची इच्छा असते. परंतु परिस्थिती मुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही आशा गरजवंताना मदतीचा हात देण्याचे काम हातभार चॅरिटेबल ट्रस्ट करते. त्यांच्या या कार्यात प्रत्येकाने सहभाग घ्यायला हवा असे शाळेचे शिक्षक केशव जाधव यांनी यावेळी सांगितले व हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले.