
मंडगणड : लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अंतर्गत वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने अनुवंशशास्त्राचे जनक ग्रेगर जॉन मेंडल यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून डॉ. शैलेश भैसारे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. संगीता घाडगे, डॉ. विनोदकुमार चव्हाण, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभाग प्रमुख डॉ. संगीता घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करुन त्यांच्या जीवन व कार्यावर थोक्यात प्रकाश टाकला.
मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ.शैलेश भैसारे म्हणाले की, अनुवंशशास्त्राचे जनक ग्रेगर जॉन मेंडल यांचे कार्य विज्ञानाला चालना देणारे असून त्यांनी अनुवंशकतेच्या नियमांचा सर्वप्रथम अभ्यास केला. त्यांच्या या संशोधनाचा आधुनिक जनुकियशास्त्र तसेच वैद्यकशास्त्र इत्यादींना फायदा झालेला दिसून येतो. या संशोधनामुळे जनुकिय अनुवंशीक आजार,त्याचे संक्रमण व त्यावर उपाय शोधले जात आहेत. त्याचा फायदा मानवी जीवन अधिक सुखकर मदत झाली आहे. तसेच या संशोधनाचा उपयोग आधुनिक जैवतंत्रज्ञानात होत असून त्यामुळे फळांची व पीकांचे नवनवीन वान तयार करण्यास मदत होते. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. विनोदकुमार चव्हाण यांनी मानले.










