गावठणवाडी कला क्रिडा मंडळाचं कार्य कौतुकास्पद : डॉ. चंद्रकांत सावंत

Edited by:
Published on: December 29, 2024 18:47 PM
views 265  views

सावंतवाडी : गावठणवाडी कला क्रिडा मंडळ गेली ११ अकरा वर्षे मंडळ विविध उपक्रमांसह महोत्सवाचे आयोजन करताना स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत आहे हे कौतुकास्पद आहे. तसेच मंडळाने सुसज्ज रंगमंच उभारून ग्रामीण भागातील मंडळासमोर एक आदर्श ठेवला आहे. असे प्रतिपादन आदर्श शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांनी केले.ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळ आयोजित गाव चव्हाटा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. चंद्रकांत सावंत बोलत होते. 

यावेळी व्यासपिठावर ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, तिलारी पाटबंधारे सावंतवाडी उपविभागीय अभियंता संतोष कविटकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाजी गावकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, कवी कृष्णा देवळी, रमेश गावकर, मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर,  सामाजिक कार्यकर्ते बाळा गावकर, गुरुनाथ कोटकर, अमोल गावकर, नामदेव गावकर, मुंबई मंडळाचे ओटवणे संपर्कप्रमुख दशरथ गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर, शिक्षक मिलिंद गावकर, सुनिल मेस्त्री, मंगेश चिले,

आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे सी व्ही सहाय्यक नंदू शिरोडकर यांनी गावठणवाडी कला क्रिडा मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद असून मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची एकजूट आदर्शवत आहे. त्यामुळेच या मंडळाने आपल्या  उपक्रमासह कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली असून मंडळासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी बाळा गावकर यांनीही मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी तिलारी पाटबंधारे उपअभियंता संतोष कविटकर यांनी ओटवणे गावातून जाणाऱ्या तिलारी कालव्याच्या गळतीची पुढील वर्षात दुरुस्ती करण्यात येणार असून संपूर्ण ओटवणे गाव या कालव्याच्या पाण्यातून सिंचन क्षेत्राखाली आणण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने सध्या गावात पोटकालव्यांची कामे सुरू असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी येण्याच्या दृष्टीने कामे करून घ्यावीत. त्यामुळे तिलारी कालवा गावाला वरदान ठरणार असून शेतकऱ्यांनीही शेतीचे प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून व्यापारी तत्त्वावर उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.  या कार्यक्रमात नंदू शिरोडकर, डॉ चंद्रकांत सावंत, संतोष कविटकर, अमोल गावकर, मिलिंद गावकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या आदित्य कविटकर, मधुकर चव्हाण, कृष्णा गावकर, स्वरा तावडे, पांडुरंग उर्फ बाळू गावकर,रेश्मा गावकर यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मंडळाचे सचिव महेश गावकर तर आभार मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर यांनी मानले.यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सर्व बालकांसह विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा कलाविष्काराने रसिकांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन पत्रकार महेश चव्हाण यांनी केले. या महोत्सवाचे मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यानी उत्कृष्ट नियोजन केले होते.