देशात हुकुमशाही आणण्याचे काम सुरु : आ. वैभव नाईक

Edited by: विनायक गावस
Published on: February 04, 2024 07:30 AM
views 126  views

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सावंतवाडीत होत आहे. मोठ्या संख्येने उबाठा शिवसेनेचे सैनिक उपस्थित राहिले आहेत. याप्रसंगी आमदार वैभव नाईक म्हणाले, विश्वासघात करून नाव चोरल, निशाणी चोरली, पक्ष चोरला, आमदार चोरले. पण, आमचा शिवसैनिक तुम्ही चोरू शकत नाही. आज सावंतवाडीत जमलेले शिवसैनिक हे त्यांचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. 

आज महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात आहेत. हे लोक त्यांना खतपाणी घालायच काम करत आहे. मराठी माणसा विरूद्ध कट रचला जात आहे. अनेक मुख्यमंत्री दबावाला बळी करत आहेत. पण, उद्धव ठाकरे दबावाला बळी पडले नाही, झुकले नाहीत. त्यांचा विरोध पक्षाला नाही तर प्रवृत्तीला आहे‌. लोकशाही टिकवायची गरज असताना मोदी सरकार म्हणून हुकुमशाही आणण्याच्या काम सुरु आहे. महाराष्ट्रात याला कडाडून विरोध झाला. आज लोकांचे प्रश्न बाजूला सारून राममंदिर, हिंदु-मुस्लिम वाद भडकवण्याच काम काही लोक करत आहेत. भाजपात गेल्यावर सगळं माफ होत आहे. दीपक केसरकर यांनी काय विकास केला हे सगळ्यांना माहीत आहे. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ या कॅबिनेट मंत्र्यावर आली आहे. खासदार विनायक राऊत लोकसभेसाठी पुन्हा लढणार आहेत. त्यांच्या मागे खंबीरपणे उभे रहा. सत्य विरूद्ध असत्य अशी ही लढाई आहे‌. त्यामुळे महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही अन् झुकत नाही हे दाखवून देऊ असं विधान आ. वैभव नाईक यांनी केल.

यावेळी गौरीशंकर खोत, अरूण दुधवडकर, शैलेश परब, जान्हवी सावंत, सतिश सावंत, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, बाळू परब, राजू नाईक, सुशांत नाईक, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.