नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्वागत कमान ठरतेय लक्षवेधी

लवकरच जानवली पुलावर देखील करणार अशा प्रकारची कमान
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 27, 2023 11:43 AM
views 194  views

कणकवली शहरात विविध उपक्रम व विकास कामे मार्गी लावत असताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायत कडून अनेक योजना देखील राबवल्या गेल्या. त्यात कणकवली शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या गडनदी पुलावर कणकवली नगरपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली या टॅग लाईन खाली एलईडी स्वागत कमान आजपासून कार्यान्वित करण्यात आली. गडनदी पुलावरच श्रीधर नाईक उद्यानाजवळ कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या संकल्पनेतून कणकवली शहरात येणाऱ्या महामार्गावर वरील प्रत्येक प्रवाशाचे स्वागत व्हावे या उद्देशाने ही एलईडी स्वागत कमान तयार करण्यात आली आहे. जेणेकरून कणकवली शहरात प्रवेश करत असताना कणकवली ची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने गडनदी पुलावर ही एलईडी लाईटची स्वागत कमान लावण्यात आली आहे. येत्या काळात जानवली नदीवर देखील अशा प्रकारे कमान उभारण्यात येणार असून, लवकरच या कमानीचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांच्या या मागणीला अखेर मूर्त स्वरूप आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.