
दोडामार्ग : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल अगदी काही वेळात जाहीर होण्यास सुरवात होणार आहे. त्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले असून १० वाजल्यापासून मतमोजणीस सुरू होणार आहे. ९ टेबलांवर प्रत्येकी ९ ग्रामपंचायत प्रमाणे २५ ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. यासाठी महसूलचे कर्मचारी व मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी
बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज झालेत. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व ऋषिकेश अधिकारी यांच्या चोख बंदोबस्तात ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युती आणि काही ठिकाणी महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत असून सावंतवाडी तालुक्यात २८ पैकी केर भेकुर्ली, विर्डी व मोर्ले या ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात. तर मणेरीत सरपंच पद बिनविरोध झालेय. फुकेरीचे सरपंच पद रिक्त राहिलेय, मात्र १०१ सदस्य बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत २३ सरपंच पदासाठी ६९ उमेदवार तर १०५ सदस्य पदासाठी तब्बल २२६ उमेदवार रिंगणात आहेत . त्यांच्यासाठी तालुक्यातून एकूण २६ हजार ९०७ मतदारांपैकी १८ हजार ३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९ हजार ५५४ महिला तर ८ हजार ७६९ पुरुष मतदारांनी मतदान केले. ६८.१० टक्के एवढ मतदान झालं होत. त्याची काही वेळात मतमोजणी होणार असून दोडामार्ग मधील निवडणूक लढविलेल्या उमेदवरात २३ सरपंच पदाचे गावकारभारी कोण आणि २२६ पैकी ग्रामसत्तेत जाणारे १०५ भाग्यवान उमेदवार कोण हे अगदी काही तसाताच निकालाअंती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, तालुक्यातील उसप , पिकुळे , कोनाळ, झरेबांबर-आंबेली, कुंब्रल, झोळंबे, आडाळी या लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. अगदी काही वेळात तर फटाके कोण फोडणार आणी कुणाची बोलती बंद होणार, हे पाहणे फार औत्स्युक्याचे ठरणार आहे.