
देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या सार्थक कर्ले व अथर्व फाटक यांनी सादर केलेल्या 'मासे विक्रेत्यांसाठी ट्रॉली' या मॉडेलला जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथे आयोजित जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या सार्थक कर्ले व अथर्व फाटक यांनी सादर केलेल्या 'मासे विक्रेत्यांसाठी ट्रॉली' या मॉडेलला जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
त्यांना विज्ञान शिक्षक सतीश कुमार कर्ले यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अॅड. अजित गोगटे, सचिव प्रवीण जोग, शाळा समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर व मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.