
वैभववाडी : भात लावणी सुरू असतानाच मळ्यात भलेमोठे पायरीचे झाड वाऱ्यामुळे कोसळले.सुदैवाने भात लागवड करीत असलेल्या कुणालाही दुखापत झाली नाही मात्र पावर ट्रिलरचे मोठे नुकसान झाले.हा प्रकार रविवारी ता.१ सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला.
तालुक्यात भातरोप पुर्नलागवडीला वेग आला आहे.. सोनाळी चव्हाणवाडी येथील शेतकरी नामदेव राजाराम दर्पे हे घराशेजारी असलेल्या शेतमळ्यांमध्ये भातरोप लागवड करीत आहेत.काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते पावर ट्रिलरच्या सहाय्याने नागंरणी करीत होते.याचवेळी शेतमळ्याच्या बांधावर असेलेले भले मोठे पिंपळाचे झाड अचानक मुळासकट उमळून पडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच हातातील पॉवर ट्रीलर तिथेच सोडून बाजूला पाळ काढला. ते काही अंतरावर बाजूला गेल्यावर झाड शेतात पडले. या घटनेत पॉवर ट्रीलरचा मोठे नुकसान झाले आहे.या शेतमळ्यांच्या बाजुला देखील काही शेतकरी काम करीत होते.सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.