सावंतवाडीत रंगला दहीहंडीचा थरार

दोन वर्षांच्या ब्रेकनंतर गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात गोविंदा मैदानात
Edited by: विनायक गांवस
Published on: August 19, 2022 19:04 PM
views 220  views

सावंतवाडी : कोरोना निर्बंधातून बंधनमुक्त झाल्यानंतर दहिहंडी उत्सव मोठ्या दणक्यात अन् धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात गोविंदा मैदानात उतरला. अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदापथकाच्या माध्यमातून मानाची दहिहंडी फोडत सावंतवाडी शहरातील उर्वरित हंड्या फोडण्यासाठी प्रारंभ करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. 

 संस्थानकालीन मुरलीधर मंदीर इथं धार्मिक कार्यक्रमासह आरती करण्यात आली. यानंतर मंडळाचे अध्यक्ष अमेय तेंडोलकर यांच्या वडीलांच नुकतच निधन झाल्यानं त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मानाची दहिहंडी फोडण्यात आली. यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून विसर्जन स्थळी नेत असताना चौकाचौकातील दहिहंड्या फोडण्यात आल्या. मोठ्या जल्लोषात हे गोविंदा पहायला मिळाले.

यावेळी माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, विनायक ठाकुर, देव्या सुर्याजी, अँड. अतु्ल केसरकर, अर्चित पोकळे, सनी जाधव, मयूर लाखे, महेश पाटील, अविनाश पाटील, युवराज नाईक, राकेश लाखे, धीरज लाखे, अरुण घाडी, मयूर लाखे, महेश पाटील, अविनाश पाटील, युवराज नाईक, राकेश लाखे, धीरज लाखे यांसह अमेय तेंडोलकर मित्रमंडळाचे गोविंदा उपस्थित होते.