
वैभववाडी : शहरात बुधवारी दुपारी तृतीयपंथींनी दहशत माजवली होती. नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे काढून घेत होते. हा प्रकार शहरातील नागरिकांना लक्षात येताच त्यांना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे.
आज तालुक्याचा आठवडी बाजार आहे.या दिवशी तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ खरेदीसाठी आले होते.या ग्रामस्थांकडून तृतीयपंथीं जबरदस्तीने पैसे काढून घेत होते.बाजारासाठी आलेल्या अशाच एका महीलेकडून जबरदस्तीने पाचशे रुपये काढून घेतले.तसेच पैसे देण्यास नकार देणाऱ्या महीलांना शाप देत होते.अखेर नाईलाजाने काहींनी पैसे दिले.अखेर ही बाब शहरातील काही तरुणांना समजली.बसस्थानक परिसरात त्यांनी या तृतीयपंथींना पकडून चोप दिला.त्यानंतर त्या सहाजणांना पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
मुळात हे तृतीयपंथीं नसून ते बनावट असल्याचे ही बोलले जात आहे.त्यांच्याकडे बनावट ओळखपत्र आढळली.शहरात सापडलेले हे सहा जण शेगाव येथील असल्याची माहिती समोर येत आहे.