टेंम्परेचर वाढतंय..! | राणे - राऊतांच एकाचवेळी सावंतवाडीत शक्तीप्रदर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 21, 2024 05:59 AM
views 315  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे प्रतिस्पर्धी एकाच दिवशी सावंतवाडीत आले होते. राऊत यांनी प्रचाराचा नारळ फोडला. तर राणेंनी केसरकरांना सोबत घेऊन प्रचार कार्यालयाचा शुभारंभ केला. 

महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडीत येत श्री देव पाटेकराच दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला. शहरातीव बाजारपेठेत व्यापारी, मतदारांची त्यांनी भेट घेतली. प्रतिष्ठीत नागरिक, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासी भेटी दिल्या. पक्ष बदलूंना पालकमंत्री केलं,अर्थराज्यमंत्री केलं. आम्ही, उपाशी राहीलो. पण, तुम्हाला खायला घातलं. मात्र, खाल्लेल्या ताटात घाण केलेली ही अवलाद आहे. कृतघ्नता ज्यांच्या रक्तात आहे ते दीपक केसरकर असा जोरदार हल्लाबोल करत खासदार विनायक राऊत यांनी केसरकरांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.  तर विरोधकांच्या टीकेला जास्त किंमत देत नाही. 'गिर गये तो भी टांग उपर' अशी त्यांची अवस्था आहे. कालच शक्ती प्रदर्शन हे आटापिटा करून गोळा केलेल होत. उन्हात तापणाऱ्या महिला शिव्या घालत होत्या‌. इंडिया आघाडीच विराट दर्शन व कालच केविलवाण दर्शन यातून आमचा विजय निश्चित झाला आहे‌. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून  पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळे किमान अडीच लाखांच मताधिक्य मिळेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ केला. मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शहरात महायुतीचा कार्यकर्त्यांकडून राणेंच जंगी स्वागत करण्यात आल. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणे प्रथमच शहरात आले होते‌ व सोबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचं डिपॉझिट शिल्लक ठेवणार नाही. विनायक राऊत यांच डिपॉझिट जप्त करून मी निवडून येणार असा दावा महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. तर रत्नागिरी-सिंधुदुर्गचा येणारा काळ उज्वल असेल असं मत राणेंनी व्यक्त केल. तर कोकणासाठी उद्धव ठाकरे, विनायक राऊत दहा वर्षांत काहीही करू शकले नाहीत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या जिल्ह्याच्या, कोकणच्या  विकासासाठी मोठ योगदान दिलं आहे‌. विनायक राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निवडून आले. त्यांना याचा विसर पडला आहे. विनायक राऊत यांनी आपले किती दिवस शिल्लक आहेत ते मोजावेत. त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहीलेत असा घणाघात दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना केला. राणे-राऊत एकाचवेळी सावंतवाडीत आल्यानं शहरात खऱ्या अर्थानं निवडणूकीच वातावरण पहायला मिळालं. महायुती आणि महा आघाडीनं प्रचारात आघाडी घेत आपला उमेदवार विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. तर दोन्ही पक्षांतील उमेदवार , नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या खोचक टीकेमुळे लोकसभेतील राजकारणाच्या तव्याच टेंम्परेचर वाढायला सुरुवात झाली आहे.