आचिर्णे येथील 'ते' काम थांबवलं | अतुल रावराणे यांनी केली होती तक्रार

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 10, 2023 14:09 PM
views 536  views

वैभववाडी : आचिर्णे ग्रामपंचायतीसमोरील दुकान गाळे नुतनीकरणाचे सुरू असलेले काम अखेर आज बंद करण्यात आले.शासकिय प्रक्रिया पूर्ण न करता हे काम सुरू होते.याबाबाबत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.

आचिर्णे ग्रामपंचायतीसमोरील दुकान गाळे नुतनीकरणाचे काम सुरू आहे.हे काम करताना ग्रामपंचायत व सरपंच यांनी शासकीय प्रक्रिया पूर्ण न करता काम केले आहे.जुन्या इमारतीचं निर्लेखन व नविन कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली नाही असं अतुल रावराणे यांच मत आहे.त्यांनी याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.जिल्हा स्तरावरून या कामाच्या चौकशीचे आदेश आले आहेत. मात्र यानंतरही काम बुधवारी सुरू करण्यात आले होते.तालुकास्तरावरील अधिकारी यांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर हे काम थांबविण्यात आले आहे.याबाबत गावच्या ग्रामसेविका श्रीमती हांडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, इमारतीच्या नुतनीकरणाचे काम सद्यस्थितीत बंद आहे.स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इमारतीचे समोरील भागात असलेली वाळू बाजूला करण्याच काम सुरू होतं.अस श्रीमती हांडे यांनी सांगितले.