
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून गौरविण्यात आले. तालुक्यातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या यशवंतांच गुणगौरव राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी व कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या हस्ते करण्यात आला. यशस्वी विद्यार्थी व पालकांना सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
दोडामार्ग तालुक्यातील बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातून प्रथम हर्षदा राजन बोरकर, द्वितीय अनुष्का गोविंद राऊत व तृतीय क्रमांक प्राप्त पुंडलिक परशुराम कोतेकर व धनंजय जावू खरवत यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दोडामार्ग ज्युनिअर कॉलेजमधून प्रथम आलेली हर्षदा राजन शेटकर, द्वितीय पियूष मोरजकर, तृतीय सेजल गोपाळ गवस, सरस्वती विद्यामंदिर कुडासेतून प्रथम आलेली अनुष्का राणे, द्वितीय पुंडलिक कोतेकर, तृतीय आदिती देसाई व न्यु इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय भेडशीतून प्रथम धनंजय जावू खरवत, द्वितीय मंगला श्रीपाद गवस, तृतीय प्रथमेश संतोष गवस व दिपा चंद्रभान हरिजन आदींचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेशभाई दळवी व कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला.
यावेळी नेहमीप्रमाणे याहीवर्षी आपले कोकण हे राज्यात अव्वल स्थानावर असून येणाऱ्या काळामध्ये हे विद्यार्थी तालुक्याचे किंवा जिल्ह्याचेच नाही तर महाराष्ट्राचे व देशाचे नाव जगभरात उज्वल करतील असा विश्वास शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते सुरेश भाई दळवी, प्रदीप चांदेलकर, संदीप गवस, ममता नाईक, उल्हास नाईक, महादेव देसाई, गौतम महाले, सागर नाईक, विवेक गवस, आनंद तुळसकर, रवींद्र साठेलकर, ऋतिक परब व पत्रकारांसह गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.