पंढरपूर इथं अण्णा महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा...!

Edited by:
Published on: April 13, 2024 11:14 AM
views 52  views

कुडाळ : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री. प.पू. सद्‌गुरू समर्थ राऊळ महाराज स्मृती स्मारक मंदिर व भक्तानिवासाचे शिल्पकार व सद्‌गुरू राऊळ महाराज यांचे शिष्य प.पू. सद्गुरू समर्थ अण्णा महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या रविवारी १४ व सोमवार दि. १५ एप्रिल २०२४ रोजी धार्मिक, सांस्कृतिक सोहळा मोठ्या भक्ती भावात संपन्न होत आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन  या निमित्ताने 14 एप्रिल, रोजी पहाटे सकाळी ६.०० वा. नित्य काकड आरती, सकाळी 7.00 वा प्रारंभ-प्रयाश्चित, पुण्यहवचन, मंहकपूजन, नंदीश्राद्ध, कौतुकबंधन स्थळप्राकार शुद्ध गंगापूजन जलाधिवास, स्थानविधी, मुख्यदेवता स्थापना, वास्तुस्थापना, ग्रहस्थापना, वास्तुहोम, ग्रहहोम, पर्यायहोम, तत्वन्यास होम, आधीवास पिंडीकाधिवास,  दुपारी 12.30 वाजता महाराजांची महाआरती व दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळीं 7 वाजता नित्य सांज आरती होणार आहे. तर 15 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 11 वाजता आवाहित देवता पूजन, स्थलप्रकार शुद्धी स. ११:४५:३० ह्या शुभ मुहूर्तावर प.पु. अण्णा राऊळ महाराजांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा तत्वन्यास महापूजा पूजांगहोम, बलिदान, क्षेत्रपाल बली पुर्णाहुती, आचार्यपूजन अभिषेक विभूती वंदन, महाआरती, महागा-हाणे, ब्राम्हण संभावना, ब्राम्हणसंतपर्ण कर्मश्वरापर्ण. व दुपारी 11.45 वाजता  श्री. प.पु. अण्णा महाराजांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा, दुपारी 12.30 ला महाराजांची महाआरती, दत्त प्रासादिक भजन मंडळ, बच्चे सावर्डे कोल्हापूर सायंकाळी - नित्य सांज आरती असे कार्यक्रम समस्त राऊळ महाराज, अण्णा महाराज भक्त परिवार, मुंबई यांचे सुश्राव्य भजन. सर्व धार्मिक विधी पुरोहित  संदीप टेंगसे मडगाव गोवा यांच्या अधिपथ्याखाली संपन्न होतील.

तरी सर्व भाविकांनी पंढरपूर येथे उपस्थित राहून या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. प. पु. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट, पिंगुळी चे कार्याध्यक्ष व सद्‌गुरू राऊळ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पिंगुळी व समस्त विश्वस्त मंडळ, भक्तपरिवार यांनी केलं आहे. ज्या भाविकाना मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी पंढरपूर येथे उपस्थित रहायचे असेल त्यांनी. ९२८४७५२७५०/०२१८६-२२४८८८/०२३६२-२२२५०८/ या नंबर वर संपर्क साधावयाचा आहे.