तेलीनंतर केसरकरांनी माजगांव धरणाच्या कोनशिलेच केलं लोकार्पण..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 05:39 AM
views 148  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भुमिपूजन होणाऱ्या माजगांव येथील धरणाचे भाजपकडून आधीच भुमिपूजन करण्यात आल. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माजगाव येथे उपस्थित राहत कोनशिलेच लोकार्पण केले. याप्रसंगी माजगांव सरपंच डॉ. अर्चना सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नारायण राणे, बाबू सावंत, सचिन वालावलकर आदी उपस्थित होते. या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेतील वाद व अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. दोघांच्या शुभारंभानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिसऱ्यांदा याच ऑनलाईन भुमिपूजन करणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण देखील उपस्थित राहणार आहेत.