कणकवलीतील पाण्याचे जलस्त्रोत वाढणार | विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्या मागणीला यश

केटी बंधाऱ्याना प्लेट लावून पाणी अडवल्याने शहरवासीयांना होणार फायदा
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 09, 2023 16:40 PM
views 187  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतचे विरोधी नगरसेवक गटनेते सुशांत नाईक यांनी कणकवलीतील केटी बंधाऱ्याला प्लेट लावण्याच्या केलेल्या मागणीला यश आले आहे. कणकवली शहरातील केटी बंधाऱ्यांना लोखंडी प्लेट लावून पाणी अडवा, अशी मागणी सुशांत नाईक यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी काही दिवसापूर्वी लघु पाटबंधारे विभागाकडे केली होती.

लघु पाटबंधारे विभागाने केटी बंधाऱ्याला प्लेट टाकून पाणी अडवलं आहे. नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी प्लेट टाकून अडवल्यामुळे याचा फायदा आता कणकवली शहरातील बिजलीनगर व कणकनगर वासियांना होणार आहे. कणकवली शहरातील जलस्रोतांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे.