कोकण रेल्वेतील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या !

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केली कारवाई
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 20, 2022 20:01 PM
views 468  views

वैभववाडी : कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची पैशांची बॅग व मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. सोनू बिसनलाल सल्लाम (33, रा. मध्यप्रदेश ) असे त्याचे नाव आहे. रत्नागिरी आडवली येथे ही कारवाई केली. गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे..

कोकण रेल्वे मार्गावर कोच्चीवल्ली एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या कापड व्यापारी रोहित रघुवीर पोतदार (रा. सुरत, गुजरात)  यांची 90 हजार रुपये असलेली पैशांची बॅग व मोबाइल अज्ञात चोरट्याने पळवून नेले होते.ही घटना २८ ऑगस्ट २०२१ रोजी घडली होती. या दिवशी मध्यरात्री एक ते चारच्या दरम्यान रेल्वे वैभववाडी ते कणकवली  रेल्वेस्थानकांच्या दरम्यान असताना पोतदार जवळ असलेली पैशाची बॅग त्यामध्ये असेल 90 हजार रुपये व एक मोबाईल अंदाजे किंमत दहा हजार असा एक लाखाचा ऐवज चोरट्याने चोरून नेला होता.पोतदार यांनी यासंदर्भात कणकवली येथील रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.त्यानंतर पोलीसांचा तपास सुरू होता. संशयित चोरटा मोबाईल वापरत होता.दरम्यान सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल लोकेशन वरून चोरट्याचा माग काढून त्याला रत्नागिरी आडवली येथून ताब्यात घेतले. वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हा असल्याने या चोरट्याला वैभववाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून कणकवली येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस नाईक राहुल पवार, पोलीस कॉन्स्टेबल अजय बिल्पे करीत आहेत.