
देवगड : देवगड तालुक्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे ७८ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात एकूण ३० मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत तालुक्यात २२७४ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद आहे.
ठाकूरवाडी येथील इब्राहिम अ. लतीफ ठाकूर यांच्या घराचे सिमेंट पत्रे तुटून सुमारे १० हजारांचे, तर गिर्ये आरोग्य उपकेंद्राचे सिमेंट पत्रे व स्लॅब कोसळून ५२ हजार, गिर्ये ग्रामपंचायतीची कौले फुटून सुमारे ४३०० तर हिंदळे येथील रवींद्र गव्हाणकर यांचे वादळी वाऱ्यामुळे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. असे एकूण मिळून सुमारे ७८ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले आहे.