'सिंधुदुर्ग महासंस्कृती' महोत्सवाची चौकशी करावी

रूपेश राऊळ यांची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 08:12 AM
views 230  views

सावंतवाडी : दोन कोटी खर्चून सावंतवाडीत होत असलेल्या सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे. याकडे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच लक्ष लेधणार असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सावंतवाडी येथे होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाकडे लोकांनी पुर्णपणे पाठ फिरवली आहे. जेवढी लोक उद्धव ठाकरेंच्या सभेला जमली होती तेवढी सुद्धा लोक शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर या महोत्सवाच्या शुभारंभाला जमवू शकले नाहीत. २ कोटी खर्च करुन केलेल्या या महोत्सवाकडे लोकांनी पुर्णपणे पाठ फिरवली आहे.

त्यामुळे कोट्यावधी खर्च करुन होत असलेल्या या सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाची चौकशी करण्याची मागणी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली. याप्रसंगी चंद्रकांत कासार, अशोक परब , संदीप माळकर आदी उपस्थित होते.