
सावंतवाडी : शहरातली मियांसाब समाधीजवळ रस्त्याची साईडपट्टी खचली असून यामुळे अपघात होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जुन्या मुंबई गोवा महामार्गावर सद्गुरू मियांसाब समाधीजवळ रस्त्याची साईडपट्टी खचली आहे. यामुळे आतापर्यंत अपघात होऊन यात अनेकांना दुखापती झाल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून, त्यांच्या निदर्शनास आणून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यान नागरिकांना नाराजी व्यक्त केली आहे.