विशाल परबांचा धक्का ; ठाकरे - कॉंग्रेस कार्यकर्ते फोडले

Edited by: लवू परब
Published on: October 31, 2025 12:50 PM
views 488  views

दोडामार्ग : शिवसेनेच्या धडाकेबाज पक्ष प्रवेश नंतर आता भाजपने दोडामार्ग तालुक्यात पक्ष प्रवेश सुरु केले आहेत. ठाकरे सेना व काँग्रेसला युवा नेते विशाल परब यांनी धक्का देत विर्डी, तळेखोल, वझरे येथील उबाठा, काँग्रे पक्षाच्याकार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.  

स्थानिक स्वराज्य संस्थानंच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलेच बदल होताना दिसत आहेत. दोडामार्ग पंचायत समिती माजी सभापती व विर्डी विद्यमान उपसरपंच एकनाथ गवस, विर्डी ग्रामपंचायत सदस्य सुरेश गवस, ब्रम्हानंद घाडी व अन्य कार्यकर्त्यांनी उबाठाला राम राम करत युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये गुरुवारी रात्री उशिरा पक्ष प्रवेश केला. 

विर्डीनंतर वझरे व तळेखोल येथील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी विर्डी येथील उत्तम आपा गवस, जयराम वासुदेव परमेकर, अर्जुन बाबू गवस, सगुण अर्जुन गवस, पुनाजी पांडुरंग गवस, नामदेव साळसकर, संतोष विश्राम गवस, ज्ञानेश्वर नारायण गवस, मधुकर महादेव माजिक, वासुदेव फटी गवस, राजाराम विष्णू गवस, विठ्ठल दत्ताराम माजिक. तर तळेखोल मधील शंकर फटि गवस, महेंद्र महादेव गवस, उमेश महादेव गवस, सगुण नकुळ मोरजकर, अक्षय वासुदेव गवस, रुपेश लक्ष्मण गवस, विजय लक्ष्मण धर्णे, प्रकाश शशिकांत गवस, सुशांत सुरेश गवस, गुरूदास सदा गवस, लक्ष्मण लाडु धर्णे, गितांजली गुरुदास गवस, शुभम अंकुश गावडे आदी शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.