समुद्री पुलामुळे देवगड कुणकेश्वर मंदिराच्या सौंदर्यात भर..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 21, 2024 14:12 PM
views 1703  views

देवगड : प्रस्तावित रेवस रेडी सागरी मार्ग हा कुणकेश्वर तीर्थक्षेत्राच्या अगदी समोरून समुद्राच्या दिशेने जाणार आहे. सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी या जागी नव्याने पूल उभारला जाणार आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पूलांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत.

या पुलाचा कच्चा आराखडा बनविण्यात आला आहे. हे सागरी पूल १.६ किलोमीटर एवढ्या लांबीचे असणार आहे. या सागरी महामार्गामुळे कुणकेश्वर मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे. या पुलाशिवाय या सागरी महामार्गावर खालील ५ पुलांसाठी नवीन मागविण्यात आल्या आहेत. या सर्व पुलांसाठी 3 हजार 105 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे.

• कुंडलिका खाडीवरील रेवदंडा-सालाव - 3.8 किमी

• बाणकोट खाडीवर कोलमांडिया-वेश्वी – 1.7

किमी

• दापोली-गुहागर दाभोळ खाडीवर - 2.9

किमी

• जयगड खाडीवर तवसाळ जयगड - 4.4

किमी

• काळबादेवी खाडीवरील पूल, रत्नागिरी - 1.8

किमी या मुळे दक्षिणकोकण ची काशी म्हणून संबोधले गेलेल्या देवगड येथील  श्री शेत्र कुणकेश्वर च्या पर्यटनात आधिकच वाढ होणार आहे.