
सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने संघटनेच्या विविध उपक्रमांना सातत्याने मिळणाऱ्या पाठबळाबद्दल आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सावंतवाडी राजघराण्याचे राजे श्रीमंत खेमसावंत भोसले तसेच युवराज लखमराजे भोसले यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या संघटनेच्या प्रत्येक पावलावर राजघराण्याचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आले आहे. याच ऋणाची जाणीव ठेवून संघटनेच्यावतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजघराण्याने संघटनेला दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हा व तालुका कमिटीच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानले गेले.
या सत्कार प्रसंगी संघटनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संतोष तळवणेकर (जिल्हाध्यक्ष),कल्याण कदम (सहसचिव), शिवा गावडे (जिल्हा संपर्कप्रमुख,ज्ञानेश्वर पारधी (जिल्हा खजिनदार),अंकिता माळकर (जिल्हा महिला अध्यक्षसंचिता गावडे (तालुका अध्यक्ष)पूजा गावडे,सेजल पेडणेकर (शहराध्यक्ष) संघटनेचे इतर सर्व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजघराण्याने दाखवलेल्या आपुलकीमुळे संघटनेला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी व्यक्त केला.










