नेमळेत फडकला ठाकरे सेनेचा भगवा !

भाजपला मोठा धक्का
Edited by: विनायक गांवस
Published on: December 21, 2022 12:21 PM
views 445  views

सावंतवाडी : भाजपच्या ताब्यात असलेल्या नेमळे ग्रामपंचायतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं विजय स़ंपादीत केला आहे. ठाकरे सेनेच्या विजयान या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी हि ग्रामपंचायत ताब्यात घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दीपिका भैरे यांना निवडून आणल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विजयान भाजपला इथं मोठा धक्का बसला आहे. ह्या विजयानंतर ठाकरे सेनेकडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला.