
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात थांड मांडून बसलेल्या जंगली हत्तीनी येथील केर-मोर्ले गावात रात्री बांबूचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. रस्त्यावरील बांबू खाऊन रत्यावरच टाकल्याने केर - मोर्ले रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद होती. तालुक्यातील केर मोर्ले गावात काल रात्री जंगली हत्तीनी येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काजू, केळी शेतीबरोबर बांबू चीही अतोनात नुकसानी सुरु केली आहे. दरम्यान त्याठीकाणी वास्तव्यास आलेल्या हंत्तीचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी येथील शेतकरी वर्गाने केली आहे.
बंगाल धरतीवरील बंदोबस्त हवेत
दरम्यान, तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले, हेवाळे, पाळये परिसरात दिवस रात्र अतोनात नुकसान करणाऱ्या जंगली हंत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी बंगाल येथील टीम आणून हंत्तीचा बंदोबस्त करणार असे सांगणाऱ्या वनवीभागाचे आश्वासन हवेतच विरगळल्याने येथील शेतकरी वर्गाने वनवीभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.