पावशी-आंबडपाल-घावनाळे रस्ता खड्डेमुक्त

ठाकरे सेनेचा पाठपुरावा
Edited by:
Published on: May 31, 2025 16:58 PM
views 125  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पावशी ते आंबडपाल-घावनाळे-आंबेरी-कालेली हा रस्ता पूर्णतः खड्डेमय बनला होता. यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांनी २७ मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ यांना चांगलेच धारेवर धरले.

पावशी ते आंबडपाल रस्ता खड्डेमय असून एप्रिल महिन्यात याचे काम करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. हा रस्ता लवकरात लवकर खड्डेमुक्त होईल, असे आश्वासन पिसाळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते. ठाकरे सेनेच्या पाठपुराव्यानंतर या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. रस्ता खड्डेमुक्त झाल्याने नागरिकांनी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.