
वेंगुर्ले : तालुक्यातील वेंगुर्ला तुळस मार्गे सावंतवाडी मुख्य रस्त्यावर तुळस घाटी येथे गोवर्धन मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यानजीक असलेल्या रस्त्याखालून जाणाऱ्या व्हाळीचे नाळे वाहून गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्गत याठिकाणी सूचना फलक व रस्त्याच्या बाजूला सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली असून पाऊस कमी झाल्यानंतर याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता श्री भगत यांनी दिली आहे.
तुळस घाटी येथे गोवर्धन मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्या नजीक वळणावर डोंगरावरून येणारे पाणी रस्त्याच्या खालून जाते. या रस्त्याच्या खाली असलेले दोन मोठे नाळे हे पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने एका बाजूने रस्ता खचला आहे. यामुळे हा मार्ग अवजड वाहतुकीस धोकादायक झाला आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत याठिकाणी सुरक्षतेच्या दृष्टीने सूचना फलक लावण्यात आले असून या मार्गावरून सावकाश वाहने हाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.