
सिंधुदुर्ग : तळकोकणाकडे जाणारा राधानगरी - दाजीपुर हा मार्ग अवजड वाहनांसाठी 45 दिवसांसाठी बंद करण्यात आलाय. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली.
10 मार्च ते 30 एप्रिल या 45 दिवसांचे दाजीपुर - राधानगरी वाहतुकीस बंद राहणार आहे. कोकणातून कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने फोंडा - कणकवली फाटा - नांदगाव - तळेरे - वैभववाडी - गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात आली. तसेच कर्नाटकातून येणारी अवजड वाहतूक वाहने कोकणात जाण्याकरिता आंबोली - आजरा - गडहिंग्लज - व संकेश्वर - गडहिंग्लज - आजरा आंबोली अशी वळविण्यात येणार आहेत.