
देवगड : देवगड तालुक्यातील किंजवडे बाईतवाडी येथील रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे.यामुळे ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत गेल्या दोन महिन्यापूर्वी बनवण्यात आलेला रस्ता मात्र जोरदार पडलेल्या मुसळधार पावसात वाहून गेला आहे. गावात रस्ता व्हावा अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी होती. मात्र दोन महिन्यापूर्वी बनवण्यात आलेला रस्ता मुसळधार पावसात वाहून गेल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.बाईतवाडी येथील चार चाकी वाहने गावातून बाहेर येणे आता जिकरीचे बनले असून दुचाकी व रिक्षा चालकांना आपला जीव मुठीत धरून आपले वाहन चालवावे लागत असल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.