'शिवसंस्कार'च्या आंतरराज्य जिजाऊ वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर !

मातृभूमी शिक्षण संस्थेद्वारा भव्य आयोजन
Edited by: रुपेश पाटील
Published on: January 11, 2023 19:24 PM
views 444  views

सावंतवाडी : दिनांक १२ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त मातृभूमी शिक्षण संस्थेच्या 'शिवसंस्कार' मार्फत 'भव्य राष्ट्रमाता जिजाऊ वेशभूषा स्पर्धा' महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये उत्स्फूर्तपणे पार पडली. ही स्पर्धा आयोजित करून शिवसंस्कारने एक आगळीवेगळी मानवंदना जिजाऊ माँ साहेबांना दिलेली आहे. यशस्वी सर्व विजेत्यांचे अनेक स्तरांवरून अभिनंदन होत आहे.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

१. शिशुगट

 प्रथम - स्वरा मळीक (लाडफे, डीचोली, गोवा),  द्वितीय - गौरी ठाकूर, (सासोली,   दोडामार्ग), तृतीय - जीविका धुरी (सावंतवाडी), उत्तेजनार्थ निधी राऊळ (मळगाव)

२. बाल गट

प्रथम - सिद्धी फळदेसाई, (बाळी, गोवा), द्वितीय - युक्ता सापळे (सावंतवाडी), तृतीय - श्रावणी किरपेकर (कराड), उत्तेजनार्थ मानसी पाटील (बेळगाव, कर्नाटक).


३. मोठा गट

प्रथम - आरोही वेरेकर, (सावई वेरे, गोवा), द्वितीय - दित्या शिरवाईकर (केपे, गोवा), तृतीय - गायत्री शेनई (तिरोडा, सावंतवाडी),  उत्तेजनार्थ - दूर्वा केसरकर (सावंतवाडी)

४. खुला गट

प्रथम - अक्षता परब (कासारववर्णे, गोवा), द्वितीय - श्रेजल नाईक (दोडामार्ग, सिंधुदुर्ग), तृतीय - शितल पोळजी (पेडणे, गोवा), उत्तेजनार्थ - स्मिता सावंत (बोरिवली, मुंबई).

स्पर्धेत विशेष सहभाग ठाणे, मुंबई येथील ओवी सावंत ही दोन वर्ष दोन महिन्याची असूनही अत्यंत उत्स्फूर्तपणे तिने सहभाग नोंदविला. त्याबद्दल आयोजकांतर्फे तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर अहमदनगर येथील युगंधरा सुद्रिक या तीन वर्षाच्या बालिकेनेही स्पर्धेत सहभाग नोंदवला तर ७२ वर्षांच्या श्रीमती अनिता नाईक (तुये, गोवा) येथून सहभागी झाल्या तसेच धनश्री नांदे (उस्मानाबाद) व प्रांजल परब (सावंतवाडी) यांनीदेखील विशेष उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला आहे.

या स्पर्धेमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात आई जिजाऊंचे साहित्य वाचण्यात आले. खरा इतिहास अभ्यासला गेला व शिव विचारांचे मंथन होऊन शिव विचारांचा जागर करण्याचा आयोजकांचा स्पर्धेचा हेतू सफल झाला, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

 स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. तसेच प्रथम तीन क्रमांकांना पोस्टाद्वारे प्रमाणपत्र पाठविण्यात येईल व प्रत्येक गटातील प्रथम क्रमांक विजेत्यांना शिवसंस्काराच्या वार्षिक भव्यदिव्य सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

चौकट

आगामी स्पर्धा

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यात दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी 'शहाजीराजे भोसले' यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'स्वराज्य संकल्पक शहाजीराजे' ही खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये १८ वर्षांवरील महिला, पुरुषांनाही सहभागी होता येईल. विजेत्यांना शिवसंस्कारच्या भव्य वार्षिक सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. तसेच संस्थेच्या वतीने प्रकाशित केल्या जाणाऱ्या स्मरणिकेत विजेत्यांचे निबंध प्रसिद्ध केले जातील.

 स्पर्धेच्या अटी पुढीलप्रमाणे

शब्द मर्यादा किमान २००० शब्द. स्वच्छ व स्वस्तक्षरात पानाच्या एकाच बाजूला निबंध लिहिलेला असावा. दिनांक २० जानेवारी २०२३ शुक्रवार रोजीपर्यंत सदर निबंध डी - २७७ सबनीसवाडा, मुक्काम पोस्ट सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. पिन - ४१६५१०. द्वारा - मातृभूमी शिक्षण संस्था.

 या पत्त्यावर कुरियर किंवा स्पीड पोस्टने पाठवावे. कृपया हस्तलिखित निबंध प्रतीवर लेखकाने आपले नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक लिहू नये, त्याची स्वतंत्र प्रत जोडण्यात यावी. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रवेश शुल्क नाव मात्र रुपये ५०  असून संस्थेचा कोड स्कॅन करून पाठवावे. निकाल ऑनलाईन वैयक्तिकरित्या व वर्तमानपत्रातून जाहीर केला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९६०७८२७२९६ आहे.


शिवजयंती निमित्त वेशभूषा, आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धा 

वक्तृत्व विषय - छत्रपती शिवाजी महाराज

वयोगट ११ ते १४ तसेच 'शिव पोवाडा' व वेशभूषा स्पर्धा या स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही. तसेच भव्य चित्रकला स्पर्धा प्रथम गट - वय वर्ष ११ ते १५ वर्षे व द्वितीय गट १६ वर्षापासून पुढे.  विषय - 'छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणताही प्रसंग'

अशा पद्धतीने अभिनव स्पर्धा घेऊन 'शिव संस्कार' महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शिवरायांचे विचार प्रज्वलित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशा पद्धतीने अभिनव स्पर्धा घेऊन शिव संस्कार महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शिवरायांचे विचार प्रज्वलित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तरी समाजातील शिवप्रेमींनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.