
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी अर्थात शांलात परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९९.५२ टक्के लागला आहे. सावंतवाडी तालुक्यातून दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १६८७ विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थी १६७९ उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ३९ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.यामध्ये ८५९ जणांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. प्रथम श्रेणीत ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत १६१ तर तृतीय श्रेणीत २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.