वैभववाडीत पावसाने उडवली दाणादाण

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 22, 2023 13:06 PM
views 263  views

वैभववाडी : तालुक्याला मागील चार दिवस मुसळधार पावसाने झोडपुन काढले. गुरुवारी( ता.२०) तालुक्यात धुवाधार पाऊस झाला.या पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे घर, गोठे, विहीरी आणि इतर मालमत्ताचे असे एकुण ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आज सकाळपासुन पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.घाटमार्ग देखील वाहतुकीस सुरळीत झाले आहेत.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन मुसळधार पाऊस सुरू होता.त्यानंतर काल पावसाने कहर केला.तालुक्याच्या सर्व भागात अतिवृष्टी झाली.सर्व नद्यांनाले दुथडी भरून वाहत होते.भुईबावडा घाटात दरड कोसळली होती.याशिवाय काही ठिकाणी कॉजवेवरून पुराचे देखील वाहत होते.परंतु आज सकाळपासुन पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.सकाळच्या सत्रात रिमरिम पाऊस सुरू होता.दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी झाल्या परंतु त्यानंतर उघडीप देखील दिली.

दरम्यान काल झालेल्या अतिवृष्टीत उंबर्डे उर्दू प्राथमिक शाळेची सरक्षंण भिंत कोसळुन २० हजार रूपयांचे नुकसान झाले,करूळ धनगरवाडीची सार्वजनिक विहीरीची संरक्षणकोसळुन ३० हजार रूपयांचे नुकसान झाले.करूळ भट्टीवाडी येथील आत्माराम जिनगरे यांच्या घराचे ८ हजार रूपये तर उंबर्डे महमंद काझी रमदुल यांच्या गोठ्याचे १० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यात एकुण ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.