व्यापाऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवणार !

मंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही | सुंदर आयोजनाबद्दल वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघाचं केलं कौतुक
Edited by: दिपेश परब
Published on: January 31, 2023 11:46 AM
views 110  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला इथल्या 35 व्या व्यापारी एकता मेळाव्यातील चर्चेअंती समोर येणा-या समस्या आणि प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातुन सोडवण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मंत्रीमंडळ बैठकीमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने मंत्री केसरकर यांनी या मेळाव्याला ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. वेंगुर्ला तालुका शाखेने या मेळाव्याचे अत्यंत सुंदर नियोजन केल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.