
सावंतवाडी : शहरातील सांडपाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून महाराष्ट्रात पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून सावंतवाडी शहराची निवड झाली आहे. त्यामुळे लवकरच नाल्यांमधून स्वच्छ पाणी वाहताना दिसणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तर सावंतवाडीच्या विकासामध्ये पत्रकारांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी वेळोवेळी करण्यात आली. त्यामुळे पत्रकार आणि सावंतवाडीचे नाते हे स्वार्था पलीकडचे आहे असेही केसरकर म्हणाले.
सावंतवाडी जिमखाना मैदानावर माजी नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी आणि पत्रकार यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्याला शुभेच्छा देण्यासाठी मंत्री दीपक केसरकर आले असता ते बोलत होते. सावंतवाडी शहरामध्ये विकासाला सुरुवात केल्यानंतर वेळोवेळी पत्रकारांनी केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले. त्यामुळे सावंतवाडी शहर आणि पत्रकार यांच्यामध्ये एक वेगळे नाते आहे. स्वार्थपलीकडे हे नाते आजपर्यंत जपण्यात आले असून शहराच्या विकासामध्ये पत्रकारांचाही तेवढाच वाटा आहे. त्यामुळे हे नाते यापुढे असेच घट्ट राहावे. दुसरीकडे सावंतवाडी शहरात पाण्याचा भेडसावणारा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रश्न लक्षात घेता तो सोडवण्यासाठी पहिला प्रोजेक्ट म्हणून सावंतवाडी शहराची निवड संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच शहरातील हा प्रश्न मिटणार असून जवळच्या नद्यांमध्ये स्वच्छ पाणी वाहताना दिसणार आहे. यावेळी पत्रकारांच्यावतीन दीपक केसरकर यांच स्वागत करण्यात आलं. मंत्री केसरकर यांनी क्रिकेटचा आनंद लुटला. थेट बॅट घेऊन ते मैदानात उतरले. ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांच्या गोलंदाजीवर त्यांनी सीमारेषेच्या दिशेनं चेंडू टोलविला. यावेळी या सामन्यांचे आयोजक माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, उमाकांत वारंग, विलास जाधव, अफरोज राजगुरू, शिप्रा सावंत, सुरेश भोगटे, शुभांगी सुकी, किर्ती बोंद्रे, दीपाली पटेकर, बाबु कुडतरकर, साक्षी कुडतरकर, उमेश कोरगावकर, राजू बेग, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, अनंत जाधव, संतोष सावंत, प्रवीण मांजरेकर, राजू तावडे, हर्षवर्धन धारणकर, वैशाली खानोलकर, नंदू मोरजकर, विनायक गांवस, अमोल टेमकर, भुवन नाईक, आनंद धोंड, शैलेश मयेकर, प्रा. रुपेश पाटील, विजय देसाई, राजेश नाईक, प्रवीण परब, जतीन भिसे, रुपेश हिराप, राजाराम धुरी, संतोष मुळीक, मयूर चराटकर, दीपक गांवकर, रामचंद्र कुडाळकर, प्रशांत मोरजकर, संजय पिळणकर, लक्ष्मण आढाव, पालिका कर्मचारी भाऊ भिसे, दीपक महापसेकर, गजानन परब, निखिल कांबळे, महेश सावंत, दिलीप सावरवाडकर, नारायण पिंगुकळर, श्री. भोसले, आदी उपस्थित होते