युवराज्ञींचा शहरात झंझावाती प्रचार !

'डोअर टू डोअर' जात गाठीभेटी
Edited by: विनायक गांवस
Published on: November 20, 2025 14:25 PM
views 384  views

सावंतवाडी : भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी आज प्रभाग क्रमांक ६ मध्ये जोरदार प्रचार केला. यावेळी भाजपचे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार अमित गवंडळकर, मेघा डुबळे यांचाही त्यांनी प्रचार केला. भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. 

युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, लोकांच्या भेटीगाठी आम्ही घेत आहोत. लोक सांगत असलेल्या समस्या ऐकत आहोत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा भर असणार आहे. प्रचाराला चांगला प्रतिसाद भाजपकडून मिळत आहे‌. तर महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर म्हणाल्या, भाजप हा विकास करणारा पक्ष आहे. लोकांची साथ आम्हाला आहे. त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्षांस नगरसेवक देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या शर्वाणी गांवकर, भाजपचे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार अमित गवंडळकर, मेघा डुबळे, सुमित वाडकर आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.