कणकवलीत झेंडूच्या फुलांचे दर गडगडले...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 23, 2023 19:32 PM
views 506  views

कणकवली : कणकवली बाजारात झेंडूच्या फुलांचे दर गडगडले असून, पन्नास रुपयाला दोन किलो असा दर आज या फुलांचा कणकवलीत बाजारात पाहायला मिळाला आहे. फुल विक्रेते दादा पावस्कर यांनी तर मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.  दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या  फुलांना फार महत्त्व असते प्रत्येक या झेंडूच्या फुलांचे हार आपल्या देवांना, वाहनांना घालतात व पूजा करतात तसेच झेंडूच्या फुलांनी नवीन खरेदी करणाऱ्या वस्तूला याच फुलांचे पुष्पहार घालतात. 

दोन दिवसापूर्वी हीच फुले शंभर रुपये किलो विकली जात होती पण आज अचानक पणे हा दर कणकवली बाजारात गडगडलेला पाहायला मिळाला आहे.