पोलिसांनी लाच न घेण्याची घेतली शपथ

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 30, 2023 20:15 PM
views 311  views

कुडाळ : कुडाळ येथील पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मी पैसे घेणार नाही, नागरिकांची कामे प्रामाणिकपणे करणार अशी शपथ लाचलुजपत प्रतिबंध विभागाच्या सप्ताह निमित्त घेतली.

लाज लुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने भ्रष्टाचार मुक्त समाज या संदर्भात जनजागृती सप्ताह सुरू करण्यात आला आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी मी पैसे घेणार नाही, नागरिकांची प्रामाणिक कामे करण्यात अशी शपथ घेणे अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने कुडाळ पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मी पैसे घेणार नाही नागरिकांची कामे प्रामाणिकपणे करणार अशी शपथ घेतली.