'त्या' खून प्रकरणी पोलीसांनी या वस्तू केल्या जप्त !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 07, 2023 20:01 PM
views 544  views

वैभववाडी : सोनाळी वाणीवाडी येथील जयश्री साटम या महिलेच्या खुनासाठी संशयित आरोपीने वापरलेल  हत्यार अखेर पोलीसांना सापडले. गुन्हयांसाठी वापरलेली दुचाकी देखील पोलीसांनी जप्त केली आहे. याशिवाय तपासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपुर्ण पुरावे पोलीसांच्या हाती लागले आहेत.

सोनाळी वाणीवाडी येथील श्रीमती साटम यांचा २ ऑगस्टला रात्री ८वा.दरम्यान निर्घुणपणे खुन झाला.या प्रकरणी पोलीसांनी संशयित आरोपी सचिन निखार्गे याला रात्रीच ताब्यात घेतले होते. त्यानंतर गेले काही दिवस तो पोलीस कोठडीत आहे.मुंबईतील विविध पोलीस स्थानकांत गंभीर चोऱ्या, बलात्कार ,विनयभंग असे गुन्हे दाखल असलेला संशयित हा सराईत गुन्हेगार आहे. तो पोलीसांना तपासात अजिबात सहकार्य करीत नाही. मात्र गेले चार पाच दिवस पोलीस दिवसरात्र या खुनाचा तपास करीत आहेत. तपासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण पुरावे गोळा करण्यात पोलीस मग्न आहेत. मात्र महिलेचा निर्घुण खुन ज्या हत्याराने केला ते हत्यार पोलीसांना मिळत नव्हते. परंतु ते हत्यार आता पोलीसांना सापडले आहे. या प्रकरणातील हा महत्वाचा पुरावा आहे. गुन्हयांसाठी ज्या दुचाकीचा वापर केला ती देखील पोलीसांनी जप्त केली आहे.याशिवाय अन्य काही महत्वपुर्ण पुरावे देखील पोलीसांनी जमा केले आहेत. अजुनही काही तांत्रिक पुरावे जमा करण्याचे काम पोलीसांकडुन सुरू आहे.

दरम्यान संशयित आरोपीला काल ता.६ न्यायालयात हजर केले होते. त्याला तीन दिवसांची कोठडी मिळाली आहे.त्यामुळे उद्या पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.