लग्नाचा बनाव करून पैसे उकळणाऱ्या टोळक्याला पोलिसांचा हिसका !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: March 04, 2024 14:59 PM
views 91  views

कुडाळ : लग्नाचा बनाव करून पैसे उकळणाऱ्या टोळक्याला कुडाळ पोलिसांच्या पथकाने अवघ्या तीन ते चार दिवसात गजाआड केले तीन टप्प्यात या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे  लग्न लावून देण्याची मध्यस्थी करणारे फरारी असून त्याचा शोध लवकरच घेऊ असे पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी सांगितले सिंधुदूर्ग जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे त्यामध्ये कोणी फसू नये असे आवाहनही श्रीमती मुल्ला यांनी केले

   यातील तक्रादार वय वर्षे ४२ हे मागील चार वर्षापासून लग्नाकरीता स्थळ पहात होते. त्यांची ओळख एक महिन्यापुर्वी अझिज सुलेमान नाईक रा. माणगांव ता. कुडाळ व महेश श्रीकांत पाटकर रा. पाट दळवीवाडी ता. कुडाळ यांचेशी झाल्यानंतर त्यांना तक्रारदार यांनी लग्नासाठी मुली पहात असल्याचे सांगितले त्यावेळी वरील दोन्ही इसमानी मिळून एक मुलगी आपल्या परिचीत असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. व कुडाळ कोर्टा जवळील पाटेश्वर मंदीरात बोलावून घेऊन त्याठिकाणी अनिज नाईक याने चार पुरुष व महिला यांना आणून मुली दाखवली तिचे नाव रुपाली दत्ताजी पाटील असल्याचे सांगितले, त्याठिकाणी असलेल्या इतर आरोपींची ओळख त्या मुलीचे नातेवाईक म्हणून करुन दिली. लग्न कार्यासाठी १,४०,०००/- रुपये तक्रारदार यांचेकडून घेतले. त्यानंतर दि. २५.०२.२०२४ रोजी हुमरमळा वालावल येथे रुपाली दत्ताजी पाटील हिचेशी धार्मिक पध्दतीने लग्न लावून दिले. दि. २६.०२.२०२४ रोजी ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी तक्रारदार लग्न केलेल्या युक्तीसह गेले व घरी आले, त्यानंतर दुपारनंतर रुपाली दत्ताजी पाटील ही परस्पर घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली.त्यानंतर तक्रारदार यांनी रुपाली दत्ताजी पाटील हिचे बाबत माहीती काढली असता तिच्या सोबत आलेले इतर महीला व पुरुष हे तिचे सख्खे नातेवाईक नसल्याचे निष्पन्न झाले यावरुन तक्रादार यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कुडाळ पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिलेवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. २८.०२.२०२४ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीम, रुणाल मुल्ला, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक बी.जी. गायकवाड यांनी तपास सुरु केला. व संशयित आरोपीत १. विशाल मच्छिद्र थोरात वय ३४ वर्षे रा. उंदीरगांव रस्ता, गोडेगांव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, तसेच आरोपीत २. माधुरी प्रभाकर केदारी ऊर्फ भारती मदन ठोंबरे वय ३२ वर्षे रा. संजयनगर, सुतगिरणी गेट, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर यांना तात्काळ शोध घेऊन अटक करण्यात आली त्यानंतर आरोपी टोळीमध्ये परजिल्हयातील महिला व पुरुषांचा समावेश असल्याने पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश कराडकर व पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, महिला पोलीस श्रीम, पाटकर, श्रीम. योगिता राणे, चालक पोलीस श्री. समीर बांदेकर यांचे पथक तात्काळ अहमदनगर जिल्हयात रवाना केले, पोऊनि कन्हाडकर व पथकाने अहमदनगर, शिडीं भागात आरोपींचा शोध घेऊन उर्वरीत आरोपी ३. संतोष दौलू काकडे वय ३७ रा. शिरोली ता. करवीर जि. कोल्हापूर, ४. संतोष गणाजी जगदाळे वय ४० रा. दहीवडी ता.मान जि.सातारा, ५. विशाल मच्छिद्र थोरात वय ३४ रा. उंदीरगांव, ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर, ६. सो, माधुरी प्रभाकर केदारी ऊर्फ भारती मदन ठोंबरे वय ३२ वर्षे, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर, ७. सौ. ज्योती संतोष शेलार वय ४३ वर्षे रा. ता. वाई जि.सातारा, ८. सौ. मंगल संजय महापूरे वय ४८ वर्षे रा. हेलें हातकलंगले जि.कोल्हापूर यांना दि०३.०३.२०२४ व दि. ०४.०३.२०२४ रोजी अटक केलेली आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. रुणाल मुल्ला, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक बी जी. गायकवाड हे करीत आहेत.


दरम्यान या बाबत बोलताना पोलिस निरीक्षक श्रीमती मुल्ला म्हणाल्या विशाल थोरात व माधुरी केदारी उर्फ भारती ठोबरे यांना 28 मार्चला जिल्ह्यातच ताब्यात घेण्यात आले त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती तर रूपाली पाटील व ज्योती शेलार  यांना तीन मार्चला नगर मधून अटक करण्यात आली तर संतोष जगदाळे संतोष काकडे मंगल महापुरे यांना चार मार्चला पंढरपूर येथून अटक करण्यात आली या सर्वांना आज न्यायालयात हजर  केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे विशाल थोरात व माधुरी केदारी यांना एकूण पाच दिवसाची पोलीस कोठडी यापूर्वी मिळाली होती त्यात आज दोन दिवसाची भर पडून एकुण सात दिवसाची व अन्य सशयीत यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडत असताना सर्वांनी सतर्क राहणे काळाची गरज आहे कोणीही कोणत्याही आमिषाला किंवा फसवणूकीला बळी पडू नका  अधिक माहितीसाठी पोलीस स्टेशनशी संपर्क साधा असे आवाहनही श्रीमती मुल्ला यांनी केले