सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली

जपून पाणी वापरण्याचं आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: July 24, 2024 10:39 AM
views 192  views

सावंतवाडी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर झाड पडून पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पाण्याची कमतरता शहरात भासणार आहे. तरी नागरिकांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन पाणी पुरवठा अभियंता भाऊ भिसे यांनी केले आहे. दरम्यान, याबाबत युद्ध पातळीवर काम सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.