
मालवण : मँग्रोव्ह फाउंडेशन, इको फोक्स व्हेंचेर्स, महाराष्ट्र वनविभाग आणि स्वराध्या फाउंडेशन मालवण आयोजित जिल्हास्तरीय माध्यमिक आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा 2024 मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नेरूर समृद्धी प्रतिष्ठान मुंबई संचलित आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नेरूरच्या डॉ. नंदिनी देशमुख निर्मित, किशोर नाईक लिखित, सौरभ पाटकर व किशोर नाईक दिग्दर्शित तरंगत्या बेटावर या एकांकिकेने सांघिक तृतीय क्रमांक पटकवला.
तसेच स्त्री अभिनय प्रथम क्रमांक कु अनुरा मुकुंद चौधरी व पुरुष अभिनय तृतीय क्रमांक कु आयुष आकाश चव्हाण यांना मिळाला. या एकांकिकेसाठी नेपथ्य भूषण सारंग, बबन सारंग, शाम सारंग, प्रकाशयोजना साई नाईक, वैभव आकेरकर, पार्श्वसंगीत विजय वालावलकर, भूषण सारंग, वेशभूषा मिलिंद नाईक, योगेश शर्मा, बबन सारंग तर रंगभूषा आरोही तारी, धनश्री सारंग, योगिता म्हाडदळकर यांनी केली होती.