महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला मतदानाचा आढावा

Edited by: दिपेश परब
Published on: May 07, 2024 11:08 AM
views 185  views

वेंगुर्ला :  शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा परिषद माजी सभापती प्रितेश राऊळ यांनी शिरोडा रेडी भागातील महायुतीच्या बूथना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला. यावेळी कोस्टेल शिवसेना तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, शिरोडा ग्रामपंचायत माजी उपसरपंच रवी पेडणेकर, माजी सदस्य कौशिक परब आदी उपस्थित होते.

संपूर्ण तालुक्यात फिरताना महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. यामुळे नारायण राणे यांचाच विजय निश्चित असल्याचे यावेळी सचिन वालावलकर यांनी सांगितलं.