
कणकवली:शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ कणकवलीच्या निवडणूकीसाठी १५ जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.त्यावर आज छाननी प्रक्रिया पार पडली.त्यात उमेश वाळके यांच्या अर्जावरील हरकत फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे सर्वही अर्ज पात्र ठरले आहेत. आता भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (मविआ) यांचे १५ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात स्पष्ट झाले आहे. सहकारी संस्था सहनिबंधक के. आर. धुळप यांच्या उपस्थतीमध्ये ही छाननी प्रक्रिया पार पडली. या दरम्यान उमेश वाळके यांच्या उमेदवारी अर्जावर विनिता बुचडे यांनी वैश्य समाज पतसंस्थेत थकबाकी असल्याबाबत हरकत घेतली होती.त्याबाबत श्री.वाळके यांनी कर्ज भरणा केल्याबाबत पुरावा सादर केल्यामुळे हरकत फेटण्यात आली आहे.आता दाखल उमेदवारी अर्जावर माघार घेण्याचा कालावधी २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर आहे.अर्ज माघार कोण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.त्यामुळे पुढील काळात संस्थेच्या निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडणार आहे.