मुख्याध्यापक जाधव यांच्या पाठीशी शिक्षकेतर कर्मचारी संघ भक्कमपणे उभा -अनिल राणे यांचे प्रतिपादन !

'त्या' मारहाण प्रकरणी शिक्षकेतर कर्मचारी संघातर्फे जाहीर निषेध
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 10, 2023 12:39 PM
views 429  views

 सावंतवाडी : कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांना झालेल्या मारहाण प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघ सिंधुदुर्ग व सावंतवाडी तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघ सावंतवाडी यांचेतर्फे झाल्या दुर्दैवी घटना प्रकरणी जाहीर निषेध करण्यात आला आहे.

सदर  बातमी कळताच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, सचिव गजानन नानचे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष वैभव केंकरे,  उपाध्यक्ष हर्षाली खानविलकर, तालुका सचिव गोविंद कानसे, कार्यकारणी सदस्य भिवा धुरी, अनिल जाधव, शरद जाधव, सौ. निशा रेवडेकर, तळवडा हायस्कूलचे लिपिक श्री. मोर्ये सर, सुमन राऊळ, प्रवीण शिर्के, तसेच शिक्षकेतर कर्मचारी संघाचे मार्गदर्शक काका मांजरेकर आदि उपस्थित होते.

यावेळी अनिल राणे यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग शिक्षकेतर कर्मचारी आपल्या पाठीशी असून या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत व भविष्यात काही मदत लागल्यास आम्ही आपल्या सोबत कायम आहोत, असे आश्वासन दिले.