
वैभववाडी : भाजपचे नुतन जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज वैभववाडी तालुक्याचा दौरा केला.अध्यक्ष निवडीनंतर श्री.सावंत हे वैभववाडीत पहील्यांदाच आले.त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची घरी जाऊन भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.तालुक्याच्या पहिल्या भेटीत माध्यमांशी थेट बोलण्याचे टाळले.मात्र यापुढे तालुक्यात येत राहू त्यावेळी बोलू अस सांगितले.
श्री सावंत यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर ते पहील्यांदाच तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. पक्ष वाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचं आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी थेट बोलण्याचे टाळले. तालुक्यात यापुढे बैठकीसाठी असेच येत राहू.त्यावेळी आपल्याशी बोलू अस सावंत यांनी पत्रकारांना सांगितले.