पर्यटन महासंघाच्या चळवळीला शासनाचं पुर्ण सहकार्य लाभेल : हनुमंत हेडे

Edited by: विनायक गावस
Published on: July 21, 2023 13:42 PM
views 111  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग या निसर्गसौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला फार मोठी संधी असून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाने या जिल्ह्यातील ग्राम पर्यटनावर विशेष लक्ष केंद्रित केले असून त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यात आयोजित केलेल्या पर्यटन विषयक परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. सावंतवाडी तालुक्याची ही परिषद आज जुन्या गटविकास अधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. 

आपल्या प्रास्ताविक संबोधनात पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कार्यवाह अॅड नकुल पार्सेकर यांनी उपस्थित सर्व सरपंचाना आवाहन केले की ग्रामीण पर्यटनाच्या विकासासाठी शासन आर्थिक मदत द्यायला तयार असून त्यासाठी गावातील ग्रामपंचायत आणि त्या गावातील गावाच्या विकासासाठी सकारात्मक विचार करणाऱ्या ग्रामस्थांनी एकञ येवून पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या या चळवळीस हातभार लावावा त्यासाठी पर्यटन संचनालयाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य द्यायला सदैव तयार असल्याचे सांगितले. 

आपल्या समारोपाच्या संबोधतनात चाळीस हून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंचाना पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी  मार्गदर्शन केले. ग्रामीण पर्यटन विकासासाठी आपण सगळ्यानी झोकून देऊन काम करण्याची आवश्यकता असून आपल्या गावातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा तपशीलवार माहिती संकलित करून शासन स्तरावर सादर करा. यासाठी पर्यटन व्यवसायिक महासंघ आपणास सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी अनेक सरपंचानी या संकल्पनेबाबत काही प्रश्न विचारले त्याचे निराकरण श्री मोंडकर यांनी केले. 

यावेळी पर्यटन व्यवसायिक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. श्री कमलेश चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख श्री किशोर दाभोलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री जितेंद्र पंडित, पर्यटन व्यवसायिक श्री प्रमोद सावंत, श्री शिरोडकर, तसेच सावंतवाडी तालुक्यातील चाळीसहून जास्त सरपंच व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.