सामाजिक समस्यांची जाणीव मुलांमध्ये असावी : सुनील डुबळे

वैश्य समाज वेंगुर्ल्याचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Edited by: दिपेश परब
Published on: July 25, 2025 14:10 PM
views 341  views

वेंगुर्ले : आपल्या मुलांमध्ये भरपूर गुणवत्ता भरलेली आहे. नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ती मिळालेल्या संधीच सोन केल्या शिवाय रहाणार नाहीत.  शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक समस्यांची जाणीव मुलांमध्ये होणे आवश्यक आहे. युवकांनी समाज कार्यात पुढे यावं, त्यांना सर्वतोपरी सहकार्य आपण करू असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांनी वेंगुर्ले येथे केले.

वैश्य समाज वेंगुर्ला तालुक्याचा वार्षिक गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शैक्षणिक आर्थिक मदत वितरण कार्यक्रम २० जुलै रोजी येथील साई मंगल डीलक्स हाॅल येथे संपन्न झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, संस्थेचे खजिनदार सुरेश भीसे, उद्योजक दिनेश तानावडे, निवृत्त बॅंक अधिकारी अनुप काणेकर हे मान्यवर उपस्थित होते.  मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके देवून गौरविण्यात आले. या मध्ये मेघःशाम स्वार आणि निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती विद्या शिरसाट यांनी दिलेल्या देणगी मधुन देखील गुणवंत विद्यार्थ्यांना पारीतोषिके देण्यात आली. वैश्य समाज वेंगुर्ला यांच्याH वतीने प्रती वर्षी देण्यात येणारा  'जीवन गौरव पुरस्कार ' या वर्षी ज्येष्ठ व्यावसायिक वासुदेव जनार्दन बांदेकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

     सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पत  संस्थेच्या वेंगुर्ला शाखा अधिकारी संस्कृती पारकर यांनी पत संस्थेच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली आणि सर्वांनी संस्थेचे सभासद होण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमासाठी उद्योजक आणि विठ्ठल मंदिर ट्रस्ट सावंतवाडी चे विश्वस्त महेश उर्फ आबा श्रीकृष्ण केसरकर यांनी दहा हजार रुपयांची देणगी दिली, त्यांच्या या आर्थिक सहकार्या बदल वेंगुर्ला वैश्य समाज अध्यक्ष सुनील डुबळे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी साठी मोठ्या संख्येने वैश्य भगिनी आणि बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत काणेकर यांनी केले तर आर्यन डुबळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश सापळे, बाळा शिरसाट, संजय तानावडे, राजेश डुबळे दिलीप पांगम.  वेटेसर  यांनी परीश्रम घेतले.