
देवगड : देवगड जामसंडेची ग्रामदेवता असलेल्या श्री दीर्बादेवी किल्ला येथील गणपती मंदिर च्या भेटी साठी दिनांक २०/२/२०२५ रोजी जाणार आहे. त्यासाठी नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी गावाची स्वच्छता, रंगरंगोटी, मानकरी व ग्रामस्थांचे भोजन व्यवस्था या विषयांवर चर्चा करण्यात आली. देवगड जामसंडेची ग्रामदेवता श्री दीर्बा देवी गणपती मंदिर किल्ला येथील गणपतीच्या भेटीसाठी तब्बल १३ वर्षानी जाणार आहे. हा योग १३ वर्षांनी जुळून आला आहे. या संदर्भात नियोजन आढावा बैठक ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाली.