
वैभववाडी: शहरातील स्टॉल धारकांची तातडीची बैठक नगराध्यक्ष यांनी बोलावली आहे. गेली काही दिवस सुरू असलेल्या स्टॉल धारकांच्या कारवाई विरोधातली ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सायंकाळी चार वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत काय तोडगा पडतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
शहरातील शासकीय जागेतील अतिक्रमण हटवण्याबाबत नगरपंचायतीने निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील स्टॉल धारकांना नोटीसा दिल्या आहेत. त्या दृष्टीने शुक्रवारी शहरातील स्टॉलवर कारवाई होणार होती परंतु काही कारणास्तव ही कारवाई पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आज या स्टॉल धारकांबाबत निर्णय घेण्यापूर्वी नगराध्यक्षांनी सर्व स्टॉल धारकांना नगरपंचायतीत निमंत्रित केले असल्याचे कळते.त्यांच्यासमवेत बैठक आयोजित केली आहे. याबाबतचे पत्र ही स्टॉल धारकांचे प्रमुख राजू पवार यांना दिले आहे.आज सायंकाळी चार वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीत नगरपंचायत कोणता निर्णय घेते ,तसेच स्टॉलधारक काय भूमिका घेणार आहेत हे महत्त्वाचे असणार आहे. या बैठकीकडे स्टॉलधारकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.