दोडामार्गवासीयांच्या लॉंग मार्चचा दुसऱ्याच दिवशी रिजल्ड

उद्योजकांना मिळाल्या लँड अलॉटमेंटच्या ऑर्डर
Edited by: संदीप देसाई
Published on: August 21, 2023 19:04 PM
views 151  views

दोडामार्ग : आडाळी औद्योगिक क्षेत्र स्थानिक विकास कृती समितीच्या रविवारच्या आडाळी ते बांदा लॉंग मार्चला प्रचंड यश प्राप्त झाले आहे. एमआयडीसीने या लाँग मार्चच्या दुसऱ्याच दिवशी आज सोमवारी उद्योजकांना लँड अलॉटमेंटच्या ऑर्डर काढल्या आहेत.

    मूळ डेगवे येथील व सध्या पुणे येथे स्थायिक युवा उद्योजक  स्वप्निल विठ्ठल देसाई यांच्या कोकण फूड अँड स्पायसेस या कंपनीला ए 39 क्रमांकाचा प्लॉट अलॉट  करण्यात आल्याची माहिती सतीश लळीत यांनी दिली आहे. या लँड अलॉटमेंट ऑर्डर वर  19 ऑगस्ट 2023 अशी तारीख असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

श्री. देसाई यांना आडाळी येथे उद्योग सुरु करण्यासाठी ओद्योगिक क्षेत्र कृती विकास समितीचे पदाधिकारी सतीश लळीत यांनी प्रवृत्त केले होते. देसाई यांना प्लॉट बाबत वितरण पत्र मिळताच त्याची माहिती फोन करुन लळीत यांना दिली आहे. त्यामुळे हे जनतेच्या लाँग मार्च चे यश असल्याची माहिती श्री. लळीत यांनी कोकणसादला दिली आहे.